जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी जी सेक्टरमधील रवी इंडस्ट्रीज कंपनीला रविवारी सायंकाळी लागलेली आग रात्री उशीरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीच्या दुर्घटनेची एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली असून एमआयडीसी पोलीसांकडून पंचानामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, आग विझली असली तरी, परिसरातील नागरिकांच्या मनात भीती कायम आहे.
रवी इंडस्ट्रीज या कंपनीत रविवारी सायंकाळी अचानक स्फोट झाला होता. एकापाठोपाठ एक असे तासाभरात पाच मोठे स्फोट झाल्याने हा संपूर्ण परिसर हादरला होता. ही कंपनी बेकायदेशीरपणे चालवली जात असल्याचा अारोप शेजारी असलेल्या अविजिता इंटरप्राईझेस कंपनीचे मालक रमेशचंद्र बेहडे यांनी केला आहे. त्यांच्या केमीकल कंपनीमुळे रमेश बेहेडे याच्या कंपनीत आग लागल्याने या आगीत गायीचे वासरूचा जळून मृत्यू झाला. कंपनीत पाईप करण्याचे कच्चा माल, ग्रेडींग पावडर, मिशीनरी, मोटारी, राहते घर, घरातील सामान यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीतील नुकसानीबाबत अविजिता इंटरप्राईझेस कंपनीचे मालक रमेशचंद्र बेहडे नुकसानीबाबत तक्रार दिली आहे.