यावल प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाड गावातील जे तरुण सैन्यात, पोलीस खात्यात कार्यरत आहेत. अशा सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांचा आधार फाऊंडेशनतर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
शिरसाड गावातील पी.एस.आय. किरण बार्हे व योगीराज वळींकार, विनायक सोनवणे, संदीप सोनवणे हे सी.आर.पी.एफ. तर संदीप विजय पाटील हे एअर फोर्स मध्ये कार्यरत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आधार फाऊंडेशनचे संस्थापक तेजस पाटील, शिवम पाटील, अभिषेक पाटील, दीपक खंबायत, महेश कोळी, विलास कोळी, वसीम तडवी, भैरव नरवाडे, पवन धनगर, विशाल कोळी, धनंजय धनगर, दिनेश कोळी, समाधान अलकरी, निलेश कोळी, यांच्यासोबत अनेक तरुण उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्ती आई-वडिलांना गहीवरून आले. त्यांनी आभाराची भावना यावेळी बोलून दाखवली. तसेच आपल्या मुलाविषयी गर्व आहे की, ते देशसेवा करत असल्याचे असे गौरवउद्गार पालकांनी यावेळी काढले. गावातील तरुणांनी अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे देशभक्तीचे वातावरण गावात निर्माण होत असते.