जळगाव, प्रतिनिधी | शिवसेनेचे सचिव आणि ‘भावोजी’ फेम आदेश बांदेकर यांची २ ऑगस्ट पासून ‘माऊली संवाद’ यात्रा सुरू झाली आहे. ही संवाद यात्रा जळगावात बुधवार २१ ऑगस्ट रोजी येणार आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना महिला आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील लोकांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी आणि समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने ‘माऊली संवाद यात्रा’ सुरू करण्याचे ठरवले आहे. सचिव असलेल्या आदेश बांदेकर यांच्या खांद्यावर सेनेने ही जबाबदारी टाकली असून ते माऊली संवादामार्फत राज्यातील महिलांशी संवाद साधणार आहेत. २ ऑगस्टपासून या माऊली संवादाला सुरुवात करण्यात आली आहे. बांदेकर हे बुधवार २१ ऑगस्ट रोजी जळगावला येत आहेत. शहरातील सरदार वल्लभ भाई पटेल भवन येथे येथे माऊली संवादातून महिलांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती शिवसेना प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी यांनी कळविले आहे.दरम्यान, बांदेकर यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पदमालय विश्रामगृह येथे महिला आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिलहाप्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, मंगला बारी, शरीफा भिस्ती, मनीषा पाटील, ज्योती शिवदे, श्रद्धा घोष, नीलू इंगळे आदी उपस्थित होते. . आदेश बांदेकरांचा माऊली सवांद दौर्यात महिलांनी मोठ्या संखेने उपस्थिति द्यावी असे आवाहन जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे यांनी केले आहे.