शिवाजी नगर हुडको परिसरात तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील हुडको भागात राहणाऱ्या तरूणाला किरकोळ कारणावरून लोखंडी पट्टीने डोक्यावर मारून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन रमेश पाटील (वय-२४) रा. हुडको शिवाजी नगर जळगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गजानन पाटील हा मजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्यासोबत बबलु जोहरे रा. हुडको हा देखील राहतो. दरम्यान मंगळवारी ४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गजानन  पाटील आणि बबलु जोहरे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यात बबलू जोहेरे हा दारूच्या नशेत गजाननला शिवीगाळ करून मारहाण करून डोक्यात लोखंडी पट्टी टाकली. यात गजानन जखमी झाल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी बुधवार ५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शहर पोलीस ठाण्यात बबलू जोहरे याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ललीत भदाणे करीत आहे.

Protected Content