Home क्राईम घरगुती वादातून तरूणाला काठीने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

घरगुती वादातून तरूणाला काठीने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

0
50


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील नितीन साहित्या नगरात घरगुती वादातून एका तरूणाला दोन जणांवर शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केली. याबाबत सोमवारी ३१ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अरविंद्र अरूण वाघोदे (वय-२६) रा. नितीन साहित्या नगर, सुप्रिम कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ३० जुलै रोजी रात्री ९ वाजता माया पाटील आणि त्यांच्या सोबत असलेला राजू काल्या (पुर्ण नाव माहित नाही) यांनी घरगुती कारणावरून वाद घातला. त्यानंतर अरविंद्र वाघोदे याला शिवीगाळ करू लागले आणि काठीने बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यात तरूण जखमी झाला आहे. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अरविंद्र वाघोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी ३१ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात माया पाटील आणि राजू काल्या या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound