Home क्राईम विहिरीत पडल्याने जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

विहिरीत पडल्याने जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विहिरीचे काम करत असतांना तोल जावून खाली पडल्याने जखमी झालेलया तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची कळमडू शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. ईश्वर भालेराव सोनवणे वय ३८ रा. कळमडू ता. चाळीसगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील कळमडू गावात ईश्वर सोनवणे हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता ईश्वर सोनवणे हा कळमडू शिवारातील शेतात विहिर खोदण्याच्या ठिकाणी काम करत असतांना त्याचा अचानक तोल गेला. त्यामुळे तो विहीरी पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तातडीने त्याला विहीरीतून बाहेर काढून चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथील के.ई.एम हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. परंतू त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याचा मंगळवारी २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता दुदैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound