Home क्राईम शेंदुर्णी येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

शेंदुर्णी येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

0
29


चाळीसगाव प्रतिनिधी । देवीची ज्योत घेऊन येत असताना तालुक्यातील वाघळी येथील बंधाऱ्यात आंघोळीला गेलेल्या १८ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली असून मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.

याबाबत वृत्त असे की, घटस्थापनेसाठी देवीची ज्योत सप्तश्रृंगी गडावरून घेऊन येत असताना तालुक्यातील वाघळी येथील बंधाऱ्यात आंघोळीला गेलेल्या सुनिल वाघमारे (वय-१८) रा. शेंदुर्णी ता. जामनेर या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या दुदैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान सुनिल याचा मृतदेह मिळून न आल्यामुळे ग्रामीण पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देवीची ज्योत घेऊन निघालेल्या या युवकाची प्राणज्योत मावळल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound