शतपावली करणाऱ्या तरुणाला दुचाकीची धडक

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी. | शतपावली करीत असलेल्या शेख मोहम्मद नूर जावेद (वय ३६, रा.भवानीपेठ, इस्लामपुरा, जळगाव ) या तरुणाला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिली. ही घटना ६ जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भिलपुरा चौकात घडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. शुक्रवार 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजता त्याने दिलेल्या तक्रारीवरुन दुचाकीस्वार आकाश दिनेश जाधव (रा. राजमालतीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भवानी पेठेतील इस्लापुरा परिसरात शेख मोहम्मद नूर जावेद हा तरुण राहतो. ६ जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तो भिलपुरा चौकातून शतपावली करीत होता. यावेळी (जीजे ०५, एमयू ८५८३) क्रमांकाच्या दुचाकीस्वार रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जात होता. या भरधाव दुचाकीस्वाराने शेख मोहम्मद या तरुणाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाच्या पायासह डोके, पाठ व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तरुणाने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने शुक्रवार २१ जून रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार धडक देणारा दुचाकीस्वार आकाश दिनेश जाधव रा. राजमालतीनगर याचयाविरुद्ध गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मराठे हे करीत आहे.

Protected Content