किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार शास्त्राने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शिवीगाळ का केली याचा जाब विचारल्याच्या रागातून धारदार शस्त्राने तरुणावर वार करुन जखमी केल्याची घटना बुधवार १५ रोजी रात्री ११ वाजता पिंप्राळा हुडको चौकात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फारुख शेख जाफर (वय-१७, रा. ख्वाजानगर जळगाव) असे जखमीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, फारुख शेख हा तरुण बुधवारी १५ मे रोजी रात्री ११ वाजता हुडको चौकात आला होता. त्यावेळी समीर उर्फ सोनु लुकमान शेख (रा. पिंप्राळा हुडको) याने त्याच्याकडे पाहत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का केली, अशी विचारणा फारुख याने केली असता दोघांमध्ये बाचाबाची झाली. चौकातील लोकांनी हे भांडण सोडविले. त्यानंतर रात्री पिंप्राळा हुडको चौकात अंडाभुर्जी खाण्यासाठी जात असताना पोलीस चौकीच्या गल्लीत समीर उर्फ सोनु याने शस्त्राने मानेवर पाठीवर वार करत फारुक याला जखमी केले. या प्रकरणी तक्रारीनुसार गुरुवार १६ मे रोजी पहाटे ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहेत.

Protected Content