फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून एका तरूणाला चौघांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तर एकाचे तरूणावर चाकूहल्ला करून दुखापत केल्याची घटना यावल तालुक्यातील पाडळसा गावातील हॉटेल मराठा समोर घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात बामणोद येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, यावल तालुक्यातील पाडळसा गावातील हॉटेल मराठा समोरून धनराज सुपडू भोई वय १९ रा. पाडळसा हा तरूणी दुचाकीने त्यांच्या मित्रांसोबत जात होता. त्यावेळी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून आदेश, रोहित, निलू आणि मोरे (सर्वांचे पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. बामणोद ता. यावल यांनी धनराज भोई याला शिवीगाळ करत मारहाण केली. तर यातील आदेश याने हातातील चाकूने धनराज यांच्यावर वार करून जखमी केले. ही घटना मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी ४ सप्टंबर रोजी दुपारी २ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रभाकर चौधरी हे करीत आहे.