जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिध्दार्थ नगरात राहणाऱ्या तरूणावर वर्गणी न दिल्याच्या कारणावरून चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी १६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संजय सिताराम निकम वय २५ रा. सिध्दार्थ नगर, पिंप्राळा हुडको जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एका कार्यक्रमात संजय निकम याने वर्गणी दिली नव्हती. या कारणावरून पंकज उत्तम अढांगे याने संजय निकम याच्यावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना मंगळवारी १६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता सिध्दार्थ नगरात घडली. यात संजय हा जखमी झाला. त्याच्यावर प्राथमोपचार केल्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता पंकज उत्तम अढांगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.