
जळगाव प्रतिनिधी । ममुराबाद ते जळगाव रोडवरील एकविरा मंदिराजवळ समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला कट मारल्याने तरुण खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार २९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. या संदर्भात गुरुवारी 30 जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता अज्ञात डंपर चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव ज्ञानेश्वर सपकाळे वय-२५, रा. सत्यम पार्क जळगाव हा तरुण २९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीके ०१२५) ने जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथून जळगावकडे येत होता. त्यावेळी रस्त्यावरील एकविरा माता मंदिराजवळ जळगावकडून ममराबाद गावाकडे जाणाऱ्या विनाक्रमांकाच्या डंपरने समोरून त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे सौरव सपकाळे हा खाली पडला, आणि गंभीर जखमी झाले. या संदर्भात गुरुवारी ३० जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात डंपर वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश चिंचोरे करीत आहे.


