जामनेर प्रतिनिधी | शहरापासून काही अंतरावर असलेल्या हरिओम नगर जवळ दोघा दुचाकी वाहनांच्या अपघातात प्रशांत संजय पाटील राहणार पाळधी या तरुणाचा मृत्यू झाला असून तर नांद्रा प्र लो येथील सरपंच मिलिंद गांगुर्डे व त्यांच्या पत्नी जखमी झाले आहे.
वाकी गावालगत असलेल्या हरिओम नगर जवळ सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नांद्रा प्र.लो. येथील सरपंच व त्यांच्या पत्नी दुचाकीवर जामनेरकडे जात असताना त्यांच्या व समोरून जामनेरकडून पाळधी गावाकडे जाणाऱ्या प्रशांत संजय पाटील यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात प्रशांत पाटील यांचा मृत्यू झाला असून नांद्रा येथील सरपंच व त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जामनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सदर मयतबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे