Home क्राईम गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरूणाला ठोकल्या बेड्या !

गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरूणाला ठोकल्या बेड्या !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शासकीय आय.टी.आय. परिसरातील महावितरण सबस्टेशन जवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पिस्तूल, काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तुषार विश्वास पाटील यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील शासकीय आय.टी.आय.च्या पाठीमागील महावितरण सबस्टेशन जवळ एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतूस आणि दुचाकी असा एकुण मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. अक्षय आनंदा सैंदाणे (वय २९, रा. कल्याणहोळ, ता. धरणगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करत आहेत.


Protected Content

Play sound