Home क्राईम मिरचीची पुड डोळ्यावर फेकून तरूणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला !

मिरचीची पुड डोळ्यावर फेकून तरूणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हॉटेल साई पॅलेस येथे रोडवर दुचाकीवरील अनोळखी दोन जणांनी काहीही कारण नसतांना एका तरूणाच्या डोक्यात मिरचीची पुड फेडून धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमीवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता अनोळखी दोन जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सैय्यद जावेद सैय्यद अजीज वय ३९ रा. शाहू नगर, जळगाव हा तरूण त्याच्या मित्रासोबत खोटे नगर जवळील हॉटेल साई पॅलेस येथे जेवणासाठी सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता गेले होते. जेवन करून दोघेजण बाहेर आले तेव्हा एका दुचाकीवर अनोळखी दोन बसलेले होते. दोघांनी सैय्यद जावेद याच्या डोळ्यावर मिरचीची पुड फेकली आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर मारेकरी हे पसार झाले. त्यानंतर जखमी झालेल्यास सैय्यद जावेद याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound