Home क्राईम जुन्या वादातून तरूणावर प्राणघातक हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल !

जुन्या वादातून तरूणावर प्राणघातक हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल !

0
195

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीसात तक्रार केल्याच्या रागातून सम्राट कॉलनीत एका तरूणावर धारदार लोखंडी पट्टीने वार करून गंभीर दुखापत करत बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी २८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामेश्वर भगवान महाजन वय ३५ हा तरूण आपल्या पत्नीसह सम्राट कॉलनी परिसरात वास्तव्याला आहे. रविवारी २८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता मित्रांसोबत शेकोटीवर बसलेला होता. त्यावेळी जुन्या वादात त्यांची रामेश्वर यांची पत्नीने पोलीसात तक्रार दिली होती. या रागातून रामेश्वर महाजन याला मेघराज एकनाथ लाड रा. सम्राट कॉलनी, ललीत दिक्षीत रा. ईश्वर कॉलनी आणि दुर्लभ नावाचा व्यक्ती या तिघांनी येवून धारदार पट्टीने चेहऱ्यावर वार करून गभीर दुखापत केली. त्यानंतर तिघांनी बेदम मारहाण देखील केली. यात घटनेत रामेश्वर हा गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहूल तायडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound