चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव घराचे कुलूप तोडण्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणाला लोखंडी सळईने मारहाण केली तर कारच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना शुक्रवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. याप्रकरणी रविवारी ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथे राहणारे देविदास हिरामण राठोड वय-३३ हा तरूण उल्हासनगर येथे वास्तव्याला आहे. दरम्यान, देविदास राठोड हे कामाच्या निमित्ताने शुक्रवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता घोडेगाव येथे आलेले होते. दरम्यान, त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यावेळी देविदास राठोड यांनी गावात राहणारे संजय हिरामण राठोड, लताबाई संजय राठोड, सचिन संजय राठोड, सौरभ संजय राठोड, प्रविण संजय राठोड सर्व रा. घोडेगाव ता. चाळीसगाव यांना घराचे कुलूप का तोडल्याचा जाब विचारला. याचा राग आल्याने पाचही जणांनी लोखंडी सळईने देविदासला बेदम मारहाण करून जखमी केले. तर कारच्या काचा फोडून नुकसान केले. हा प्रकार घडल्यानंतर देविदास राठोड याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण करणारे संजय हिरामण राठोड, लताबाई संजय राठोड, सचिन संजय राठोड, सौरभ संजय राठोड, प्रविण संजय राठोड सर्व रा. घोडेगाव ता. चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विकास चव्हाण हे करीत आहे.