अमळनेर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादातून एका तरूणाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात सोनू संजय कोळी वय २५ हा तरूण आपल्याक कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता सोनू कोळी हा गावातील महादेव मंदीराजवळ फोनवर बोलत असतांना जुन्या वादातून गावात राहणारे योगेश हिलाल कोळी, सुरज राजेंद्र कोळी, समाधान भास्कर पाटील आणि अक्षय राजेंद्र कोळी सर्व राहणार मांडळ ता. अमळनेर यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. जखमी अवस्थेत पडलेल्या भावाला पाहून त्यांचा भाऊ किरण संजय कोळी याने सोनूला अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर सोनू याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे योगेश हिलाल कोळी, सुरज राजेंद्र कोळी, समाधान भास्कर पाटील आणि अक्षय राजेंद्र कोळी सर्व राहणार मांडळ ता. अमळनेर यांच्या विरोधात मारवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील हे करीत आहे.




