जुन्या वादातून तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगरातील महादेव मंदीराजवळ राहणाऱ्या एका तरूणाला जुन्या वादातून एका लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ८.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सुलोचना रविंद्र माळी वय -६८ या वृध्द महिला त्यांचा मुलगा मुकेश रविंद्र माळी यांच्या साोबत .समता नगरातील महादेव मंदीर परिसरात वास्तव्याला आहे. रविवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून गल्लीत राहणारा आकाश केशव पवार याने मुकेश याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी देवून पसार झाला. याप्रकरणी वृध्द महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८.३० वाजता पोलीसात मारहाण करणारा आकाश पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे हे करीत आहे.

Protected Content