कर्जाचे हप्ता वसुलीवरून तरूणाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे कर्जाचा हप्ता वसुली कारणावरून एका तरुणाला ८ जणांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा प्रकार शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, अरुण दिलीप राठोड (वय-३२) रा. रामदेववाडी ता.जि. जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्याने काही दिवसांपूर्वी कर्ज काढले होते. या कर्जाचा हप्ता थकल्यावरून वसुली करण्याच्या कारणावरून आशिष गौतम तायडे वय-२४, ऋषिकेश घुगे वय-२२, महेंद्र पांडुरंग पाटील वय-२६, मनोज आधार सोनवणे वय-२२ , आकाश विजय बोराडे वय-२४, संदीप विक्रम सावंत वय-३३,  संदीप ताराचंद पाटील वय-३३, कल्पेश सोनवणे वय-२५ सर्व राहणार जळगाव यांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून दमदाटी केली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या अरुण राठोड हा रविवारी २२ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव देऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करत आहे.

 

Protected Content