Home क्राईम कारण नसतांना तिघांकडून तरूणाला बेदम मारहाण

कारण नसतांना तिघांकडून तरूणाला बेदम मारहाण


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील सिंधी कॉलनी परिसरात काहीही कारण नसतांना तरूणाचा रस्ता आडवून त्याला बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नोमान रजा शेख अलीम वय-१९ रा. सीटी हॉस्पिटलच्या मागे, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास नोमान रजा शेख हा सिंधी कॉलनीतून घरी जात असतांना कुणाल दिनेश पाटील रा. शनीमंदीर वार्ड, भुसावळ, गोपी अनिल धामणे आणि आकाश राजेश पारधे दोन्ही रा. वाल्मीक नगर, भुसावळ या तिघांनी रस्ता आडविला. व काहीही कारण नसतांना नोमान याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरूण गंभीर जखमी झाला. दरम्यान, याप्रकरणी नोमान रजा शेख  अलीम याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात कुणाल दिनेश पाटील रा. शनीमंदीर वार्ड, भुसावळ, गोपी अनिल धामणे आणि आकाश राजेश पारधे दोन्ही रा. वाल्मीक नगर, भुसावळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नेव्हील बाटले हे करीत आहे.


Protected Content

Play sound