जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील डोमगाव शिवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. या घटनेबाबत मंगळवारी ९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील डोमगाव येथे जयवंत सुभाष धनगर वय ३५ हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी ७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता जयवंत धनगर हा डोमगाव शिवारातील त्यांच्या शेतात काम करत असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे विश्वनाथ बंडू मंडपे, गोपाल जगन मंडपे, श्रीराम धना मंडपे, भोला धना मंडपे, रोहित गोपाल मंडपे, राखमल विश्वनाथ मंडपे आणि भूषण विश्वनाथ मंडपे यांनी लाकडी काठीने बेदम मारहाण करून दमटाटी केली. या मारहाणीत जयवंत धनगर हा गंभररित्या जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर मंगळवारी ९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्यांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहे.

Protected Content