रंगकाम करतांना तरूणाला लोखंडी वस्तूने मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवाळी निमित्त घराचे रंगकाम करतांना घरात सिंमेंटचा दगड पडल्याच्या कारणावरून तिघांकडून एका तरूणाला शिवीगाळ करत लोखंडी वस्तूने मारहाण करून दुखापत केल्याची घटना शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथे गुरूवार ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील छत्रपती शिवाजी नगरात विशाल अशोक गवळी हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या दिवाळी असल्याने विशाल हा गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या घराला रंग देण्याचे काम करत होता. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या निळे यांच्या घरात सिमेंटचा दगड पडला. या कारणावरून विशाल गवळी याला शेजारी राहणारे दिपाली प्रमोद निळे, विकी प्रमोद निळे आणि मोनू (पुर्ण नाव माहित नाही) या तिघांनी शिवीगाळ करत लोखंडी वस्तून मारहाण केली. यात विशाल हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक तुषार इंगळे करीत आहे

Protected Content