चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील बाणगाव शिवारातील शेतात नवसाच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून एका तरूणाला चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना ३० मे रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनिवार १ जून रोजी दुपारी २ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाणगाव शिवारातील शेतात नवसाचा कार्यक्रामाचे आयोजन ३० मे रोजी करण्यात आले होते. दुपारी २ वाजता दिलीप रामसिंग ठाकरे वय ३६ रा. बाणगाव ता. चाळीसगाव हे देखील नवसाच्या कार्यक्रमात गेलेला होता. त्यावेळी कार्यक्रमात दिलीप ठाकरे हा जेवणाचा डब्बा भरत होता. या कारणावरून कार्यक्रमात असलेले राजू देवचंद पवार, गणेश भुऱ्या पवार, दादाभाऊ नामदेव बोरसे, मांगू सोमा पवार सर्व रा. बाणगाव ता. चाळीसगाव यांनी दिलीप ठाकरे याला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी शनिवारी १ जून रोजी दुपारी २ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात राजू देवचंद पवार, गणेश भुऱ्या पवार, दादाभाऊ नामदेव बोरसे, मांगू सोमा पवार सर्व रा. बाणगाव ता. चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ नंदू परदेशी हे करीत आहे.