आडगाव येथे तरूणाला विटेने मारहाण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आडगाव येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाला विटेने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवार ३१ मे रोजी दुपारी १२ वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक असे की, गणेश मोतीलाल पाटील रा. आडगाव ता.यावल हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. शनिवारी शुक्रवारी ३१ मे रोजी दुपारी १२ वाजता काही कारण नसताना गावात राहणारा भरत उत्तम पाटील याने रस्त्यावर पडलेली वीट मारून दुखापत केली. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेबाबत गणेश पाटील याने शनिवारी १ मे रोजी दुपारी १ वाजता यावल पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारा भरत पाटील यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोहेकॉ वासुदेव मराठे हे करीत आहे.

Protected Content