जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात तरूणाला काहीही कारण नसतांना शिवीगाळ करत रस्त्यावरील विट डोक्यात मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील दत्त नगर येथे सोमनाथ सुरेश गोपाळ वय ३७ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सोमनाथ गोपाळ हा होणारी पत्नी सपना ससाने हिच्या सोबत सुप्रिम कॉलनीत घरासमोर बसलेले होते. त्यावेळी सपनाच्या घराच्या शेजारी राहणारा मोहित उर्फ रिंक्या जिवडे हा शिवीगाळ करत होता. त्यावेळी सोमनाथ गोपाळ याने शिवीगाळ करत असल्याचा जाब विचारला. याचा राग आल्याने मोहीत उर्फ रिंक्या जिवडे, मोहितची आई निता जिवडे, मोहितची वहिनी आणि त्याचे वडील (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव यांनी सोमनाथ गोपाळ याला शिवीगाळ करत रस्त्यावर पडलेली विट डोक्यात मारून फेकली. यात सोमनाथ हा जखमी झाला. याप्रकरणी सोमनाथने रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोहीत उर्फ रिंक्या जिवडे, मोहितची आई निता जिवडे, मोहितची वहिनी आणि त्याचे वडील (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.