हातात तलवार घेवून वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचणार्‍या तरुणाला अटक

 

 

जळगाव प्रतिनिधी  । मेस्कोमाता नगरात हातात तलवार धरुन वाढदिवस साजरा करणार्‍या २२ वर्षीय तरूणाला शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सिध्दार्थ धर्मराज निकम वय २२ रा. मेस्कोमाता नगर, असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, मेस्कोमाता नगरात २३ जानेवारी रोजी झालेल्या एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात हातात तलवार धरुन तरुण नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. व्हिडीओबाबत माहिती मिळाल्यावर त्यानुसार कारवाई करण्याच्या पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांनी कर्मचार्‍यांना सुचना केल्या. पोलीस नाईक रविंद्र पाटील, राहूल पाटील, राहूल घेटे, अनिल कांबळे व मुकूंद गंगावणे यांनी संबधित व्हिडीओमध्ये दिसणार्‍या तरुणांची माहिती काढली. त्यानुसार हातात तलवार घेवून नाचणारा तरुण निष्पन्न केले. त्यानुसार पथकाने सोमवारी मेस्कोमाता नगरातून सिध्दार्थ धर्मराज निकम वय २२ यास अटक केली. त्याने तलवार हे घराच्या मागे झाडाझुडपात लपविली होती. ५०० रुपये किंमतीची लोखंडी तलवार सुध्दा पोलिसांनी हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुकूंद गंगावणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content