भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव रोडवरील एजीसी हायस्कूल जवळ भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात बसवरील अज्ञात चालकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव रोडवरून राहूल कुमार हा त्याचा मित्र मणी प्रतापसिंग नंदलालसिंह हे दोघेजण गुरूवारी १७ जुलै रोजी दुचाकीने जात असतांना समोरून येणारी बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१४) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मणी नंदलालसिंह आणि राहूल कुमार हा जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मणी नंदलालसिंह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार परीष जाधव हे करीत आहे.




