पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील देवगाव शिवारात मेंढपाळ करणारा २१ वर्षीय तरूण हा पाण्याच्या बंधाऱ्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जगन भिमा कोळेकर वय २१ रा. आमळदे ता. धुळे असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील आमळदे येथील रहिवाशी असलेला जगन कोळेकर हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. मेंढी चारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांचे कुटुंब हे पारोळा तालुक्यातील देवगाव शिवारात मेंढी चारण्यासाठी आलेल्या होत्या. रविवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तो परिसरात असलेल्या बंधाऱ्याजवळून जात असतांना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला व पाण्यात बुडून त्याचा दुदैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश साळुंखे हे करीत आहे.




