जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील शहापूर येथील विधवा महिलेच्या डोक्यात दगड टाकून तरुणाने खून केल्याची घटना आज घडली. मयत संगीता पिराजी शिंदे ( वय ३६ ) आरोपी किरण कोळी तळेगांव (वय २६) मद्यधुंद अवस्थेत तरुणाने ३६ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना सकाळी घडली आहे.
सविस्तर वृत्त तळेगाव येथील आरोपी किरण कोळी उर्फ लाहण्या (वय २६) या तरुणाने महिलेच्या घरी जाऊन सतत महिलेसोबत वाद घालत असायचा तसेच आज सकाळी महिलेसोबत वाद घालून रागाच्या भरात तरुणाने महिलेच्या डोक्यात दगड टाकून महिलेला ठार करून तिथून पळून गेला. घराजवळील काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्वरित जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलिस यंत्रणा दाखल झाली. फरार झालेला आरोपी याचा शोध घेत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करत आहे. खुनाचे कारण मात्र समजू शकले नाही. सदर आरोपीस जामनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.