Home क्राईम रोझोदा येथील तरूणाची गळफास घेवून अत्महत्या

रोझोदा येथील तरूणाची गळफास घेवून अत्महत्या


सावदा ता. रावेर । येथून जवळ असलेल्या रोझोदा येथील २१ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे मध्यरात्री उघडकीला आले. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

प्रशांत वासूदेव मेढे (वय-२१) रा. रोझोदा ता. सावदा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. सावदा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत मेढे हा तरूण रात्री कुटुंबियासह जेवण करून ११ वाजता झोपायला गेला. दरम्यान ११ ते मध्यरात्री १ वाजेच्या दरम्याने तरूणाने काहीही कारण नसतांना राहत्या घरात गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला तातडीने खाली उतरवून गोदावरी मेडीकल कॉलेजमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडील वासुदेव धनजी मेढे यांच्या खबरीवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुरेश अढायंगे करीत आहे. 


Protected Content

Play sound