राजीव गांधी नगरात तरूणाने घेतला गळफास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजीव गांधी नगरात राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. 

सुधाकर मधुकर नाडे (वय-३५) रा. राजीव गांधी नगर जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, सुधाकर नाडे हा हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात वाद सुरू होतो. दरम्यान, आज राहत्या घरात सकाळी ८ वाजेच्या पुर्वी सुधाकरने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. त्याचा मोठा भाऊ बबन नाडे यांनी तातडीन मृतदेह खाली उतरवून त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.  याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Protected Content