अज्ञात वाहनाच्या धडकेत मुक्ताईनगरचा तरूण ठार !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रात्री एक वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी येण्यासाठी निघालेल्या तरूणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, वल्लभभाई पटेल नगरातील रहिवासी शुभम राजू उंबरकार ( वय 22 ) हा तरूण आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास होता. तो पिंप्री अकाराऊत येथील पद्मश्री लॉन येथे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. आज पहाटे एक वाजेच्या सुमारास तो कामावरून आपल्या घरी परत येण्यासाठी एमएच19 डीएक्स 9412 क्रमांकाच्या होंडा शाईन या दुचाकीने निघाला होता. तो घोडसगाव येथील उड्डाणपुलावर आला असता कोणत्या तरी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात तो जायबंदी झाला.

परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन रूग्णवाहिका बोलावली. येथून त्यांच्या मामांशी संपर्क करून याबाबतची माहिती देण्यात आली. कुटुंबियांनी तात्काळी अपघातस्थळी धाव घेऊन शुभम याला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र यापूवच त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी मयत युवकाचे मामा संतोष मधुकर सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content