मोर नदीच्या पात्रात बुडून भुसावळच्या तरूणाचा मृत्यू

 

फैजपुर, ता. यावल प्रतिनिधी ।मोर नदीपात्रातील कुराड डोहात भुसावळ येथे फोटोग्राफीचा व्यवसाय करणार्‍या तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली.

या तरुणाचे नाव विशाल अशोक पवार ( वय२७ रा. न्यू एरिया पांडुरंग टाकीजवळ) आहे .भुसावळ येथील सहा ते सात मित्र सहलीसाठी तिळ्या मोहली जवळील मोर नदीपात्रात जवळ आले असता पोहण्यासाठी कुर्‍हाड डोहात उतरले असता त्यात विशाल पवार या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला

या घटनेची माहिती मिळताच सपोनि प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ सूरदास, हे कॉ उमेश पाटील पो कॉ विनोद पाटील घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालय करण्यात आले या घटने प्रकरणी राकेश राजेंद्र रामटेके यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल राजेश बराटे करीत आहेत.

Protected Content