फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आमोदा येथे काही कारण नसताना तरुणाला शिवीगाळ करून मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी बुधवारी २७ जुलै रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अनिल व्यंकट शिवलकर (वय 39, रा. आमोदा ता. यावल) हा तरूण आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी २७ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावात उभा असतांना काही कारण नसताना नईम खाटीक रा. फैजपूर याने शिवीगाळ करून मारहाण केली. तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अनिल शिवलकर याने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नईम खाटीक याच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सोनवणे करीत आहे.