
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने गावातील होलेवाडा परिसरात भाड्याने राहणाऱ्या घरात शेंगोळा गावातील तरूणाने तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गजानन येडूबा गावंडे वय ४० रा. शेंगोळा ता. जामनेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावातील रहिवाशी असलेला गजानन गावंडे हा जूने जळगावातील होलेवाडा परिसरात वास्तव्याला होता. सराफ दुकानावर मजूरीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी ही माहेरी गेलेली होती. त्यामुळे तो घरात एकटाच होता. दरम्यान मध्यरात्री त्यांने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. नंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शशीकांत पाटील हे करीत आहे.



