भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील तिघांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना 22 ऑगस्ट रोजी घडली होती. यापैकी एक तरुण हा गंभीर अवस्थेत होता. शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेताना त्याचा बुधवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता मृत्यू झाला. घटनेप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे २२ ऑगस्ट रोजी एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने दोघांसह गणेश देवराम सोनवणे (वय ३०) या युवकाला चावा घेतला होता. यामुळे गणेश सोनवणे याला तातडीने जळगांवला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून तेथील एक दिवसाच्या उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला घरी जावून औषधोपचार घेण्याचा जाण्याचा सल्ला दिला.
मात्र, १८ दिवसानंतर गणेश सोनवणेला सोमवारी रात्री अचानक जास्त प्रमाणात त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी गणेशची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व ११ सप्टेंबर रोजी रोजी दुपारी ३ वाजता अखेर त्याचा मृत्यू झाला. यामुळे फुलगावसह परिसरात मोकाट श्वानांबाबत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मयत गणेशच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई-वडील असा परिवार असून सर्वसाधारण कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबाबत वरणगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.