Home Cities अमळनेर दुचाकी घसरल्याने तरूणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

दुचाकी घसरल्याने तरूणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अमळनेर ते चोपडारोड वरील रेल्वे पूल जवळील वळणावर दुचाकी घसरल्याने  दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी १२  डिसेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल रामभाऊ राठोड रा. जापी ता.जि. धुळे असे माहीत झालेल्या दुचाकी तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत अमोल राठोड हा त्याचा मित्र प्रवीण रामभाऊ पवार यांच्यासोबत दुचाकी दुचाकीने मंगळवारी १२  डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास जात होते. अमळनेर ते चोपडा रोडवरील रेल्वे पुलाजवळ वळण रस्ता आल्याने त्यांची दुचाकी घसरली. त्यात दोघे रस्त्यावर पडले. यामध्ये अमोल राठोड हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर सोबत असलेला प्रवीण रामभाऊ पवार हा गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या तरुणाला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत मयताचा भाऊ मनोहर रामभाऊ राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound