भीषण आपघातात ट्रॅक्टरवरील कामगाराचा दुदैवी मृत्यू; चिंचोली गावाजवळील घटना


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ सिमेंट वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि मालवाहू पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रॅक्टरवरील कामागाराचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजय नामदेव सोनवणे वय ४० रा. गेंदालाल मील, जळगाव असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे.

अधिक असे की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात संजय सोनवणे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. ते मालधक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या वाहतूक करण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ते इतर मजूरांसह सिमेंट भरूण चिंचोली गावाकडे ट्रॅक्टरकडे (क्रमांक एमएच १९ बीजी ६०७८) ने गेले. सिमेंटच्या गोण्या खाली करून जळगावकडे परतत असतांना समोरून येणारी मालवाहू पिकअप वाहनाने त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेत संजय सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमीवस्थेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषीत केले. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.