जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| झाडाच्या फांद्या का तोडल्या याचा जाब विचारण्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात दांडा टाकून, जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तापमान येथे राहणारे वाल्मिक पंडीत पाटील (वय-३३, रा.दापोरा ता.जळगाव) या युवकाच्या वडिलांनी विष्णू रघुनाथ पाटील ( वय २८, रा.दापोरा) याला उंबराच्या झाडाच्या फांद्या का तोडल्या..? याबाबत विचारले, त्यावर विष्णूने वाल्मिक पाटील याच्या वडिलांना शिवीगाळ केली. ही माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी वाल्मिक पाटील याने विष्णूला याबाबत विचारले असता, विष्णूने वाल्मिकच्या डोक्यात दांडा मारून त्याला जखमी केले. या प्रकरणी सोमवारी जळगाव तालुका पोलिस स्टेशनमध्ये विष्णू पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुलाब माळी हे करत आहेत.