जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील समर्थ नगरात राहणाऱ्या महिलेचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातून 63 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी 29 मे रोजी सकाळी 8 वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री 9 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संगीता काशिनाथ कोळंबे वय – 43 रा. समर्थ नगर पिंप्राळा, जळगाव या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. 25 एप्रिल रोजी त्या घर बंद करून नातेवाईकाकडे गेलेल्या होत्या. तेव्हापासून त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना बुधवारी 29 मे रोजी सकाळी 8 वाजता उघडकीला आली. त्यानंतर महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री 9 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहे.