जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । दुकानावरून घेतलेल्या उधार साहित्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरून महिलेला अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, उषा रवींद्र ठाकूर (वय-४७, रा. शिरसोली ता.जि.जळगाव ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावातील सागर निंबा आस्वार रा. शिरसोली याने दुकानावरून उधार साहित्य घेतल्याने त्याचे पैसे उषा ठाकूर यांनी मागितले. त्याचा राग येऊन सागार आस्वार याने गुरूवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता वाजता महिलेला अश्लील शिवीगाळ करत डोक्यात बरणीचे झाकण टाकून मारून टाकेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी उषा ठाकूर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन शिवीगाळ करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.