Home क्राईम कारण नसतांना महिलेला चौघांकडून मारहाण

कारण नसतांना महिलेला चौघांकडून मारहाण


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील बडी खानकाह परिसरात राहणाऱ्या महिलेला कारण नसतांना चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिना असीफ शहा (वय-२८) रा. बडी खानकाह जवळ, भुसावळ या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता महिलेला कारण नसतांना परिसरात राहणाऱ्या खलील मणीयार , शबीना खलील मणीयार, मुमताज मणीयार, कन्नो मणीयार सर्व राहणार बडी खानकाह जवळ, भुसावळ यांनी पाणी भरण्याचे नळीने आणि कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करून दुखापत केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र भावसार करीत आहे.


Protected Content

Play sound