यावल प्रतिनिधी । येथील शहरातील एका शेतमजुर महीलेस शेतात काम करत असतांना सर्पदंश झाल्याची घटना नुकतीच घडली असुन सदर महीलेस उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , दि.१२ जुलै रोजी यावल येथील धनगरवाडा परिसरात राहणाऱ्या राधाबाई पाटील (वय३५) या कांततोडी शिवारातील निमजाई माता मंदीराच्या मागील बाजुस असलेल्या सोमाजी गुरव यांच्या शेतात दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असतांना राधाबाई पाटील यांच्या डाव्या हाताला सापाने दंश केल्याची घटना घडली असुन, सर्पदंश झालेल्या महीलेस सोबतच्या सहमजुरांनी तात्काळ यावलच्या ग्रामीणच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असुन , यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके व वैद्यकीय कर्मचारी जॉन्सन सोरटे यांनी तात्काळ उपचार केले असुन , सद्य परिस्थितीला सर्पदंश झालेल्या महीलेची परिस्थिती ठीक असल्याचे वृत्त वैद्यकीय सुत्रांकडुन मिळाले आहे.
दरम्यान पावसाळा सुरू झाल्याने तालुक्यात सर्वत्र शेतीच्या विविध कामांना वेग आला असुन यावेळी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांनी सर्पदंश पासुन बचावा करिता योग्य ती दक्षता व काळजी घ्यावी असे आवाहन शेतकरी व शेतमजुरांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांनी केले असुन , शेतात काम करीत असतांना किंवा ईतर ठीकाणी सर्पदंश झाल्यास त्या व्याक्तीस कुठल्याही तंत्रमंत्र करणाऱ्याकडे घेवुन न जाता तात्काळ आपल्या जवळ दवाखान्यात उपचार करावे जेणे करून त्या व्यक्तिचा जिव वाचु शकेल असे ही डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांनी सांगीतले आहे .