Home Cities जामनेर हिंगणे पिंप्री शिवारात वीज कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू

हिंगणे पिंप्री शिवारात वीज कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू


जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगणे पिंप्री येथील महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हिंगणे गावात शोककळा पसरली आहे. 

अधिक माहिती अशी की, गं.भा जिजाबाई एकनाथ राजपुत रा. हिंगणे पिंप्री ता. जामनेर या महिला आपला मुलगा भागवत सोबत राहतात. आज १५ जुलै रोजी सकाळी त्या हिंगणे पिंप्री शिवारातीत स्वत:च्या शेतात कामाला गेल्या होत्या. सायंकाळी शेतात पाऊस आल्याने त्या शेतातून  सायंकाळी ५.३० वाता शेतात काम करत असतांना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्या जागीच मृत्यू झाला. शिवारातील शेतकऱ्यांनी तातडीने फत्तेपूर येथील सरकारी रूग्णालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात मुलगा भागवत, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. 


Protected Content

Play sound