पाचोरा प्रतिनिधी । जळगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामांमुळे नांद्रा ता. पाचोरा गावातून जाणाऱ्या या रस्त्यामुळे रस्त्यावर विविध समस्या निर्माण झाल्या असून या विषय लवकर मार्गी लावावा, यासाठी नांद्रा ग्रामपंचायत व ग्रामस्थतर्फे (दि.२८) रोजी सकाळी १० वाजता रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जळगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामांमुळे नांद्रा ता. पाचोरा गावातून जाणाऱ्या या रस्त्यामुळे रस्त्यावर विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. वारंवार निवेदन देऊन सुद्धा संबंधित ठेकेदार व महामार्गाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. म्हणून नांद्रा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दि. २८ बुधवार रोजी सकाळी १० वाजता नांद्रा बसस्थानकावर रस्तारोको आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला आहे.
नांद्रा ग्रामपंचायतीने संबंधित विभागांना गेल्या वर्षभरापासून पत्रव्यवहार करुण विविध समस्या मांडलेल्या आहेत त्यात बसस्थानकावरील मुतारी बांधणे, शेत रस्ता तयार करणे, रस्त्यांचे काम अपुर्ण असल्यामुळे रस्त्याचे पाणी दलीतवस्तीकडून गावात जाते. तेथे पाईप टाकून रस्ता तयार करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचा रस्ता तयार करणे, रस्त्यामुळे उचांवर गेलेल्या व्यवसायीकांच्या दुकानांसाठी रस्ता तयार करणे, विष्णूदास महाराजांच्या मठाकडे जाणारा रस्ता हा पाईप टाकून रस्ता तयार करणे, नांद्रा बसस्थानक व माध्यमिक विद्यालय जवळ गतिरोधक बनवणे, गावातील गट. नं. ३८९/२ मधुन संबंधित कंपनीने मोठ्या प्रमाणावर मुरुम उचललेला आहे. व त्या ठिकाणी खराब मटेरीयल आणून टाकले आहे ते उचलून नेणे, गावाजवळील ५०० मिटर रस्ता हा वळण व शेती अधिग्रहणामुळे अपुरा आहे. तो विषय मार्गी लावावा अशा असंख्य समस्या दुर करण्यासाठी नांद्रा ग्रामपंचायत व ग्रामस्थ दि. २८ बुधवार रोजी सकाळी १० वाजता रस्तारोको आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनाबाबत केंद्रीय दडण वळण मंत्री नितीन गडकरी जिल्हाधिकारी जळगाव, पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, धुळे, पोलिस निरीक्षक पाचोरा यांना निवेदन देण्यात आलेले आहेत.