कोरोनाच्या आणखी एका लाटेचा इशारा

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । जागतिक आरोग्य संघटनेकडून जगाला कोरोना संक्रमणाच्या आणखी एका लाटेचा इशारा देण्यात आलाय. येणाऱ्या काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या मोठी उसळी घेण्याची शक्यता आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय.

करोना संक्रमणानं गेल्या दोन वर्षांपासून जगाला हैराण करून सोडलंय. दोन वर्ष उलटल्यानंतरही संक्रमण थांबण्याचं नाव काही घेताना दिसत नाही. याउलट चीनसारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात करोना संक्रमितांची संख्या वेगानं वाढताना दिसून येतेय. आशियातील अनेक देशांत करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येऊ शकते, असं डब्ल्यूएचओनं म्हटलंय.

चीनसारख्या देशांत डब्ल्यूएचओचा हा अंदाज खरा ठरताना दिसून येतोय. चीनमध्ये कोरोनाने  धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक शहरं लॉकडाऊन करण्यात आली आहे. त्यातच आता इस्त्रायलमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळल्याची चिंताजनक बातमी समोर आली आहे. या देशात या नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत संबंधित देशाच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

 

Protected Content