आकाशवाणी चौकात गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यप्रदेश राज्याची पासिंग असलेल्या वाहनाच्या तपासणीदरम्यान तीन गुरे निर्दयीपणे कोंबल्याचे आढळून आल्याची घटना आकाशवाणी चौकात शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता समोर आली आहे. या गुरांची वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सुटका करून वाहन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता वाहनचालक बबलू इकला बारेला (२३, रा. सेंधवा, ता. बडवाणी, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी केली जात असून शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून भुसावळकडे जाणारे एक मालवाहू वाहन (क्र. एमपी १०, झेडडी, ८५३४) वाहतूक शाखेचे पोकॉ महेश विसपुते व विजय इंगळे यांनी आकाशवाणी चौक ते इच्छादेवी चौकादरम्यान अडविले. त्यात तीन गुरे निर्दयीपणे कोंबल्याचे आढळले. या गुरांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना चालकाकडे नव्हता. हे वाहन जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले असून चालक व मालक बबलू बारेला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोउनि शांताराम देशमुख करीत आहेत.

Protected Content