अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले; तीन जणांना अटक

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल खरगोन रस्त्यावर कत्तलीसाठी अवैधरित्या मुऱ्हा जातीच्या नर व मादीचे ४९ म्हशींचे पारडू ट्राला मध्ये कोंबुन नेत असतांना रावेर पोलीसांनी कारवाई करत वाहन जप्त केले आहे. तर याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, शुक्रवारी १९ जुलै रोजी मध्यरात्री नंतर खरगोन कडून पाल येथील शेरी नाक्या जवळ टाटा कंपनीचा द्राला क्रमंक (आरजे ११ जीसी ५६९७) ला रावेर पोलीसांनी अडवून तपासणी केली. त्यात ४ लाख ९० हजार किंमतीच्या मुऱ्हा नर जातीचे २ ते ३ वर्षाचे म्हशीचे ४५ पारडू तसेच २ ते ३ वर्षाचे ४ मादि जातीचे म्हशीचे पारडू आढळून आले. या कंटेनरमध्ये त्यांना चारा पाण्याची सोय न करता वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय, दोरीने जखडून बांधून निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतूक करतांना मिळून आले. या प्रकरणी पोलीसांनी १५ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा कंटेनर जप्त केला.

याबाबत पोलीस कॉस्टेबल मुकेश मेढे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती वरून जमशेद ईस्माइलखान ,पचनाका (हरियाणा ), इरफान , ( हरियाणा), शकीबखान सोहाबखान, पचनाका (हरियाणा) यांन ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोहेकॉ विष्णू भिल करीत आहेत .

Protected Content