निर्दयीपणे कोंबून बैलांची वाहतूक करणारे वाहन पकडले; दोन जणांवर गुन्हा दाखल

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पाळधी गावाजवळ भवानी फाट्यासमोरील रस्त्याने अवैधपणे ४ बैलांची वाहतूक करणारे वाहनावर मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता जामनेर पोलिसांनी कारवाई करत पकडले आहेत. याप्रकरणी दुपारी १ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात दोन जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पाळधी गावाजवळील भवानी फाटानजीक पिकअप वाहन क्रमांक (एमएच २१ बीएच ५२९२) मधून चार बैलांची अवैधपणे आणि निर्दयीपणे कोंबून वाहतूक होत असल्याची माहिती जामनेर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने स्थानिक नागरीकांच्या मदतीने मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता कारवाई करत अवैधपणे बैलांची वाहतूक करताना वाहन पकडले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात चार बैलांना मानेला दोरीने घट्ट बांधून कोंबून वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जामनेर पोलिसांनी वाहन जप्त केले असून चारही बैलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी शुभम पाटील रा. पाळधी ता. जामनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक विशाल विठ्ठल ठोंबरे रा. जवखेडा ठोंबरी ता. भोकरदन जि. जालना आणि रिजवान साबीर कुरेशी रा. जाफराबाद जि. जळगाव या दोघांवर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बाळू भोई हे करीत आहे.

Protected Content